.element { position:fixed; bottom:1%; right:1%; padding:10px; font-family:Arial; background:#98DBF7; border:1px solid #2FBAF6; }

"आधुनिकीकरणाचा ध्यास धरून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आमचे ध्येय".......

" मी श्री.प्रदिप पाटील,सर्व शिक्षक बंधू - भगिनींचे माझ्या ब्लॉग वर सहर्ष स्वागत करत आहे" .......

शैक्षणिक बातम्या

१) school website तयार झालेली आहे प्रक्तेक शाळेचा udise numbar टाकून त्या शाळेविषयी माहिती पाहता येणार आहे . मुख्याध्यापकाला logineकरून शाळेविषयी माहिती देता येणार आहे . सूचना, sms पाठविणे हे कार्य करता येणार आहे . पालकांना शाळेविषयी सर्व माहिती पाहता येणार आहे .

विविध खेळ


      •                      क्रिकेट

        क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.
        इतिहास असे समजले जाते की ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधील केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली. सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला. १९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू सीमापार केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, पायचीत (एल.बी.डब्ल्यू.),धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे १ षटक या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात. प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ सर्वबाद झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो. जो संघ दिलेल्या षटकमर्यादेत सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपण्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.

        फलंदाज बाद होण्याचे प्रकार

        दहा वेगवेगळ्या पध्दतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नविन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद होतात तेव्हा एक डाव संपतो. खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.
        झेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबाद्चे क्षेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांना ही दिल्या जाते. ( नियम ३२)
        त्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या टोकावरिल यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३०)
        पायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु बॅटला न लागता फलंदाच्या पायावर,पॅड्वर किंवा शरीरावर आदळतो तेंव्हा पंच चेंडु यष्टींन वर गेला असता कि नाही हे ठरवुन फलंदाजाला बाद देउ शकतो. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते.
        धावचीत - जेंव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडु मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे क्षेय कोणालाही दिले जात नाही.
        यष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडु त्याला चकवुन यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेंव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३९)
        हिट विकेट
        हँडल्ड द बॉल
        हिट द बॉल ट्वाइस
        क्षेत्ररक्षणात अडथळा
        टाईम्ड आउट

        क्रिकेटचा ‍इतिहास

        क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे.
        पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो.
        क्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.
        त्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली. १७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले.
        पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.
        १८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले.
        दुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेल
        स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.
        भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.
        क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत
        क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.

        क्रिकेटची साधने व पटांगण

        चेंडू - वजन  १५५ ग्रॅम्स, परिघ  २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.
        विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.
        पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.

        खेळाची सुरूवात

        क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.
        फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.
        ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.
        हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
        राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.
        साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. 'ब्लॅक हेथ' नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.
        भारतीय हॉकी संघाची ऑलिंपिक इतिहासातली कामगिरी सोनेरी {(८ सुवर्ण १९२८-३२-३६-४८-५२-५६ अशी सहा सलग, १९६४ आणि १९८०), १ रौप्य(१९६०) आणि २ कांस्य पदके(१९६८-७२)} असली तरी गेल्या, २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी भारतीय संघ पात्र होऊ शकला नव्हता. लंडन ऑलिंपिक्सकरिता भारतीय संघाचा समावेश ब गटात असून त्यांचा सामना नेदरलंड्स (३० जुलै) न्युझिलंड (१ ऑगस्ट) जर्मनी (३ ऑगस्ट) , कोरिया (५ ऑगस्ट) आणि बेल्जियम (७ ऑगस्ट) या संघांशी होईल.

      लगो-या

      हॉकी

      हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
      राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.
      साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. 'ब्लॅक हेथ' नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.
      भारतीय हॉकी संघाची ऑलिंपिक इतिहासातली कामगिरी सोनेरी {(८ सुवर्ण १९२८-३२-३६-४८-५२-५६ अशी सहा सलग, १९६४ आणि १९८०), १ रौप्य(१९६०) आणि २ कांस्य पदके(१९६८-७२)} असली तरी गेल्या, २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी भारतीय संघ पात्र होऊ शकला नव्हता. लंडन ऑलिंपिक्सकरिता भारतीय संघाचा समावेश ब गटात असून त्यांचा सामना नेदरलंड्स (३० जुलै) न्युझिलंड (१ ऑगस्ट) जर्मनी (३ ऑगस्ट) , कोरिया (५ ऑगस्ट) आणि बेल्जियम (७ ऑगस्ट) या संघांशी होईल.


      लगो-या

      लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.
      या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.
      लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो.

      लगो-याचे मैदान

      ६ ते १३ वयोगटाच्या मुलामुलींसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे. या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

      प्रत्यक्ष खेळ व लगोरी होणे

      लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लागोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.
    1. हनुमंती कुस्ती
    2. भीमसेनी कुस्ती
    3. जांबुवती कुस्ती
    4. जरासंधी कुस्ती
    5. कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा
    6. कुस्तीचे नियम
    7. प्रसिध्द भारतीय कुस्तीगी
    8. भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी

    कुस्ती

    कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.
    आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.
    कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.
    इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता. ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.

    उद्देश

    मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश प्रतिस्पर्धास नामोहरम करणे हा आहे. त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो. मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.

    विविध पध्दती

    मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे. मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे. अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली. आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली. विविध पध्दती प्रचलित आहेत.
    भारतीय कुस्त्यांचे चार प्रमुख प्रकार पडतात ते असे:-

    हनुमंती कुस्ती

    बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील हनुमान असून त्याने बुध्दिच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रमुख्याने आढळते त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. या वरून या कुस्ती प्रकारास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.

    भीमसेनी कुस्ती

    शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकाराच्या कुस्तीत केवळ शरीरबलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभातात पांडवापैकी भीम हा मल्लविद्येत प्रविण होता, तसेच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंघ यांचा नि:पात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास भीमसेनी कुस्ती हे नाव पडले.

    जांबुवती कुस्ती

    विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन शरणागती पत्कारवयास लावणे, या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टीकोणातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.

    जरासंधी कुस्ती

    प्रतिस्पर्ध्याचा संपूर्ण नि:पात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुध्दाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराचवेळ मात करता येईना: तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सुचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टी डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.
    वरील चार प्रकारांतील शरीरास इजा हाणा-या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील नीरूपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.

    कुस्तीची साधने, पोशाख व आखाडा

    भारतीय पध्दतीत ५*५ मी. लांबीरूंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो. त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. तीवर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात. वारंवार पाणी मारून ती खो-याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते. विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६*६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो. त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही. या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.
    देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात. खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे. विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.

    कुस्तीचे नियम

    प्रत्येक कुस्ती पध्दतीचे स्वतंत्र असे नियम असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे. ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम पंचांचे असते. पंच व सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी कुस्ती निकाली न झाल्यास, चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात. कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते. ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या वजनांचे आठ गट आहेत. काही सामन्यात प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात. काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात. काही पध्दतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण उणे करण्यात येतात. त्यामुळे पुष्कळदा कमी गुण मिळवणारा विजेता ठरतो. पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.

    प्रसिध्द भारतीय कुस्तीगी

    भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणा-या जगज्जेत्या गामाचे नाव अजरामर झाले आहे. इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्य पद मिळविले. ह्या दोघांच्या तोडीचा गुंगा नावाचा पैलवानही प्रसिध्द आहे. गुलाम अलिया याने इ. स. १९०२ मध्ये युरोपातील सर्व प्रसिध्द मल्लांना जिंकून रुस्तम-ए-हिंद ही पदवी मिळविली होती. कल्लू अलिया व त्याचा मुलगा गामा कल्लू हेही सुप्रसिध्द मल्ल होते. अहमदबक्ष या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिध्द पैलवानांना हरविले होते.

    भारताची ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील कामगिरी

    इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगार व खेळाडू ऍंटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रिडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधवने फ्रीस्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला. पुढे इ. स. १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव ब्राँझ पदक मिळवून दिले. त्याच सामन्यात के. डी. माणगावे याचा पाचवा क्रमांक लागला. इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या उदयचंद, ग्यान, एस्. श्याम, महादेवसिंग यांनी आपापल्या पहिल्या फे-या जिंकल्या व सज्जनसिंह याने दोन फे-या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही. इ. स. १९६४ च्या टोकियो सामन्यात फ्रीस्टाईल कुस्तीत विश्वंभर सहावा आला.

    मैदाने


    कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगणांची ३ गटात वर्गवारी केली जाते.
    • पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. ,
    • महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच
    • किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी.
    असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.

    क्रिडांगणाविषयी माहिती

    अ) पुरुष व कुमार गट मुले यांच्यासाठी 1. क्रिडांगणाची रुंदी 10 मी. व लांबी 13 मी. असते.
    2. मध्यरेषा 6.50 मीटरवर असते.
    3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. असते.
    4. निदानरेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3.50 मीटर अंतरावर असते.
    5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
    6. सिटींग बॉक्स 8 मी X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.

    • ब) महिला व कुमारी मुली यांच्यासाठी
    1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 12 मी. असते.
    2. मध्यरेषा 6 मीटरवर असते.
    3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
    4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3 मीटर अंतरावर असते.
    5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
    6. सिटींग बॉक्स 6 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.

    • क) किशोर मुले व किशोरी मुली यांच्यासाठी
    1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 11 मी. असते.
    2. मध्यरेषा 5.50 मीटरवर असते.
    3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
    4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 2.50 मीटर अंतरावर असते.
    5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
    6. सिटींग बॉक्स 4 मी. X 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.



    खेळांचे नियम

    • नाणेफेक जिंकणारा संघ “अंगण’ किंवा “चढाई’ यापैकी निवड करतो. दुस-या डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरु करतात. त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई संघाने केलेली नसते तो संघ चढाई करतो.

    • 2) चढाई करणा-याने “कबड्‌डी’ हा उचार स्पष्टपणे आणि सलग केला पाहिजे. तसे न आढळल्यास पंचाने अथवा सरपंचाने त्याला ताकीद देऊन विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी. त्यावेळी पाठलाग करता येणार नाही.

    • 3) चढाई करणा-याने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी तसे न आढळल्यास पंचांनी विरुध्द संघाला चढाईची संधी द्यावी.

    • 4) खेळ चालू असताना खेळाडूचा कोणताही भाग अंतिम मर्यादेबाहेर जाऊ नये तसा गेल्यास तो बाद ठरविला जाईल. पण झटापटीच्या वेळी तसे असल्यास तो खेळाडू बाद नसतो. अशा वेळेस शरीराचा कोणताही भाग आत असला तरी चालतो.

    • 5) झटापट सुरु झाल्यास राखीव क्षेत्राच्या क्रीडाक्षेत्रात समावेश होतो. झटापट संपल्यावर खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात परत जाताना राखीव क्षेत्राचा उपयोग करता येतो.

    • 6) खेळ चालू असताना खेळाडू अंतिम रेषेबाहेर गेल्यास त्याला पंचांनी बाहेर काढावे.

    • 7) ताकीद देऊनही खेळाडू आपल्या अंगणात दम घालवल्यास वा “कबड्डी’ शब्द उच्चारण्यास सुरुवात करत नसेल तर त्याला बाद न देता त्याची चढाईची पाळी संपली असे जाहीर करुन विरुध्द संघाला एक गुण द्यावा.

    • 8 ) चढाई करणारा आपल्या अंगणात गेल्यावर अथवा बाद झाल्यानंतर प्रतिपक्षाने पाच सेकंदात आपला खेळाडू चढाईसाठी पाठवावा.

    • 9) चढाई करणारा आक्रमक खेळाडू बचाव करणाऱ्या खेळाडूला स्पर्श करुन आपल्या अंगणात परत जात असताना त्याला पाठलाग करता येईल परंतु चढाई करणारा पकडीतून सुटून जात असेल अशा वेळी मात्र त्याचा पाठलाग करता येणार नाही.

    • 10) चढाई करणा-या खेळाडूच्याविरुध्द अंगणात दम गेल्यास तो बाद ठरविला जाईल.

    • 11) चढाई करणारा बचाव करणा-या एक किंवा अधिक खेळाडूंना केवळ स्पर्श करुन जात असेल तर त्याचा पाठलाग करता येईल.

    • 12) एकावेळी एकापेक्षा जास्त खेळाडूंनी चढाई केल्यास ती ग्राह्य न मानता प्रतिस्पर्धी संघास चढाईची संधी दिली जाते.

    • 13) वारंवार सूचना देऊन एकापेक्षा जास्त खेळाडूंची चढाईस जात असतील तर पंचांनी प्रथम गेलेल्या खेळाडूखंरीज बाकी सर्व खेळाडूंना बाद ठरवावे.

    • 14) हेतूपुरस्पर चढाई करणा-या खेळाडूचा दम घालवणे अथवा कैची अथवा अयोग्य पकड करुन चढाई करणा-यास दुखापत करणे या गोष्टी दिसल्यास पंचांनी चढाई करणा-या खेळाडूस नाबाद ठरवावे.

    • 15) बचाव करणा-या खेळाडूने चढाई करणा-या खेळाडूला अंतिम मर्यादेपर्यंत ढकलू नये अथवा चढाई करणा-या खेळाडूने बचाव करणा-या खेळाडूला बाहेर ओढू नये. तसे बुध्दीपुरस्सर करणा-या खेळाडूस बाद घोषित करावे.

    • 16) चढाई पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चढाई करणारा आपल्या अंगणात जाईपर्यंत बचाव करणा-या खेळाडूपैकी कुणीही मध्यरेषा ओलांडू नये तसे केल्यास त्या खेळाडूला बाद दिले जाईल.

    • 17) चढाई सुरु करताना बचाव करणा-या खेळाडूने मध्यरेषेला स्पर्श करुन त्या चढाई करणा-यास पकडले अथवा मदत केली तर बचाव करणारा बाद होईल.

    • 18) जो संघ लोण करेल त्या संघास दोन गुण मिळतात. लोण झाल्यावर दहा सेकंदात सर्व संघ परत मैदानात आला नाही तर प्रतिपक्षास एक गुण द्यावा. तसे करुनही जर संघ मैदानात येत नसेल तर तो प्रत्येक पाच सेकंदाला एक याप्रमाणे सामन्याचा वेळ संपेपर्यंत गुण देत राहतील.

    • 19) वारंवार पाळी नसताना एखादा खेळाडू चढाईस जात असेल तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण द्यावा.

    • 20) चढाई करणा-या खेळाडूस सूचना अथवा जागृत करण्याचा जर प्रयत्न केला गेलातर प्रतिस्पर्धी संघास गुण द्यावा.

    • 21) प्रतिपक्षाचा एक खेळाडू बाद झाल्यास एक खेळाडू आत येतो.

    • 22) पंच किंवा सरपंचाने एखाद्या संघाला वारंवार गुण दिल्यास त्या संघाला फक्त गुण मिळतात. पण त्यांचे बाद असलेले खेळाडू उठू शकत नाहीत.

    • 23) कोणत्याही अडथळ्याने सामना बंद पडला व तो 20 मिनिटांच्या आत सुरु झाल्यास सामना उरलेल्या वेळ तेच खेळाडू व त्याच गुणसंख्येवर खेळवावा. मात्र त्यानंतर सुरु होत असल्यास सामना सुरुवातीपासून खेळवावा. त्यावेळी पूर्वीचेच खेळाडू असावेत असे बंधन नाही.

    • 24) निलंबित वा बडतर्फ खेळाडूसाठी बदली खेळाडू घेता येणार नाही. तसेच निलंबीत वा बडतर्फ करण्याचे कमी झालेल्या खेळाडूंची संख्या असताना बोनस रेषेचा नियम लागू होईल. तसेच लोण झाल्यास कमी असलेल्या खेळाडूच्या संख्येइतके गुण, अधिक दोन गुण दिले जातील.



    वयोमर्यादा व वजन वयोमर्यादा व वजन


    पुरुष -  80 किलो वजन व वयोमर्यादा नाही
    महिला गट -  70 किलो वजन व वयोमर्यादा नाही

    कुमारी गट मुली – 60 किलो वजन व वय 20 वर्षे
    कुमार गट मुले – 65 किलो वजन व वय 20 वर्षे

    किशोरी गट मुली – 50 किलो वजन व वय 16 वर्षे
    किशोर गट मुले – 50 किलो वजन व वय 16 वर्षे

    कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक भिडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.

    महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

                         लगो-या



    लगो-या

    लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.
    या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.
    लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो.

    लगो-याचे मैदान

    ६ ते १३ वयोगटाच्या मुलामुलींसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे. या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.

    प्रत्यक्ष खेळ व लगोरी होणे

    लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लागोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.

                       कबड्डी

खो खो



खोखो

हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली.

खेळाचे नियम

खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुस-या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.
खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणा-या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणा-या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करण्या-या संघाचा नववा खेळाडू बचाव करणा-या संघाच्या तीन खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणा-या खेळाडुवर खालील बंधने असतात.
· एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
·तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही
पळ्ण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडुंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
· पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस पाठ करून बसलेल्या खेळाडुंनाच तो खो देउ शकतो
· खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणा-या खेळाडुच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.
·  खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.
· ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरु रहाते.
बचाव करणा-या खेळाडुवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो
· पकडणा-या खेळाडुने (बचाव करणा-या खेळाडुस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर
बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
· बचाव करणारा खेळाडुने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास
बचाव करणा-या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडुंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.
बाद केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्यासंघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुस-या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.
खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानाला ही गोष्ट सांगावी लागते.
बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून ‘खो’ म्हटले म्हणजे तो उठून पळणा-याचा पाठलाग करू लागतो आणि खो देणारा त्याची जागा घेतो. खो मिळाल्यावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणा-याला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.
खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठ्यांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २ १/२ मिनिटे आणि दोन डावांनंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरुद्ध संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.
खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो. 

No comments:

Post a Comment